पर्यावरण दिन

लेखक: डॉ. नितीन निमकर, मुंबई
सहलेखिका: रसिका निमकर , व्हँकुव्हर, कॅनडा

पर्यावरणाच्या रक्षणासाठी संयुक्त राष्ट्र महासभा १९७२ मध्ये ५ जून ते १६ जून या दरम्यान आयोजित केली गेला पहिला पर्यावरण दिन ५ जून १९७३ रोजी साजरा झाला, या दिनी हवा, पाणी, प्रकाश, जमीन, जंगल, वृक्ष, व यासारख्या विषयांवर चिंतन व त्यावर कारवाई केली जाते या निमित्ताने हा लेखन प्रपंच.

शहरीकरण, औद्योगीकरण यामुळे समस्या तयार झालेले आहेत. त्यांचे निराकरण वेळीच झाले नाही तर पर्यावरणावर त्याचे गंभीर परिणाम होतील.

माणसाच्या राहण्यासाठी तीन गरजा आहेत अन्न, वस्त्र, आणि निवारा. या जोडीला आपल्याला पर्यावरण ही राहण्यासाठी आवश्यक आहे. आता आपण बघुया पर्यावरण म्हणजे काय? पर्यावरणाचा अर्थ आपल्या आजूबाजूला हवा, पाणी, आणि उजेड या गोष्टी. आपल्याला असे वाटत नाही का आपण पर्यावरणाचा दुरूपयोग करतोय? पर्यावरण हे स्वतः स्वतःला सावरून घेतय. आताची कॉवीड-१९ साथ हा त्यातलाच प्रकार आहे. यातून पर्यावरण स्वतःच स्वतःला सावरून घेत. आता खरच निसर्गालाच माणूस नकोसा झाला असं  वाटतय. कारण, आपल्याला घरात बसवून निसर्ग स्वतःला दुरूस्त करून घेत आहे. सगळीकडे नद्या स्वच्छ होत आहेत. हवा शुद्ध वहात आहे. पक्षांचा कलकलाट, गाई वासरांचे हंबरणे ऐकु येत आहे.

आता ठाण्यातच बघा ना पर्यावरण  प्रदूषण १५० ते १६० AQI (हवा गुणवत्ता निर्देशांक – एक्यूआय) होतं, आता त्याचं ५६ ते ६० AQI झाले. ही किमया घडली ती लॉक डाऊन मुळे  जणू जगच बंद पडलंय. यामुळे काय झालंय ओझोन लेअर रिस्टोअर झालंय त्यातलं भोक नाहीसं झालंय अंटार्टिका च्या आईस कॅप पण जागेवर येतात त्यांचा प्रसार होतोय. एकूणच काय तर पर्यावरण स्वतःला जागेवर आणतय.

या बंदीमुळे झालंय काय पेट्रोल कमी वापरलं गेलं. गाड्या कमी चालतात प्रदूषण कमी होते. वातावरणातील या बदलामुळे हरितवायू कमी झालेत, परिणामी पृथ्वीचं तापमान कमी झाले. कधी नव्हे तर पक्षी,  प्राणी हे सर्व बाहेर पडू लागलेत. मुक्तपणाने वावरू लागलेत. एकंदर काय तर पृथ्वीवर त्याचे सकारात्मक परिणाम दिसतात. हे झालं लॉक  डाऊन मध्ये घडणारे बदल, आता कायमस्वरूपी आपल्याला हे बदल तसेच ठेवता येतील की काय करू त्यासाठी?

आपल्या पातळीवर ती काय करता येईल याचा विचार करूया. आपल्याकडे नागरी समस्या आहेत त्या काय बघू. नागरी जीवनातील समस्या पूर्वी सांगितल्याप्रमाणे कचऱ्याची समस्या, पाण्याची समस्या, आणि प्रदूषण, तसेच हवेचे प्रदूषण. एक एक समस्येवरचे उपाय बघूया.

कचऱ्याची समस्या

प्रथम समस्या घनकचरा व त्याचे व्यवस्थापन. आपल्याकडे सर्व गोष्टी प्लास्टिकच्या पिशवीत गुंडाळून टाकायची सवय आहे. ओला कचरा असू दे नाहीतर सुका. अन्य काही देशात ओला आणि सुका कचरा वेगळा करतात ओला कचरा हा पटकन विघटन पावतो. सुका कचरा जसं पेपर, प्लास्टिक हे रिसायकल करता येतं.

घनकचरा हा मानवी जीवनाचा नागरी जीवनाचा अविभाज्य भाग आहे. जर ओला कचरा आणि सुका कचरा याचे योग्य नियोजन केले तर ते व्यवस्थापन सहज सुकर होईल, तसं बघायला गेलं तर भाज्या फळं यांची टरफल यात ८० टक्के पाणी असते. जर ओला कचऱ्याचे विघटन करायचे असेल तर त्यात बॅक्टरियल कल्चर टाकून सहज विघटन करता येतं. यातून तयार होणारा कंपोस्ट भारी असतं, सुपीक असतं शिवाय ८० टक्के पाण्याचा भाग उडून जातो व फक्त घन भाग शिल्लक राहतो त्यातूनही ऑरगॅनिक भाग विघटन पावतो शेवटी फक्त ५ टक्के शिल्लक राहतं ते कंपोस्ट. जर याचं विश्लेषण केलं तर असं आढळेल की यात मिनरल्स आणि ऑरगॅनिक शिल्लक आहेत. नायट्रोजन, फॉस्फरस, आणि पोटॅशियम एखाद्या उर्वरका मध्ये मुख्य घटक आहेत. याचा वापर केल्यास आपल्याकडचं केमिकल फर्टीलायझर चा वापर कमी होईल आणि आपण ऑरगॅनिक शेतीकडे वाटचाल कर. ऑरगॅनिक शेती म्हणजे हरितक्रांतीच. यातून निघणारे फळ भाज्या हे अतिशय चविष्ट व केमिकल फ्री असतात यात पेस्टिसाइड चा अंश नसतो त्यामुळे युरोप व अन्य देशात त्याला खूप मागणी आहे.

आमचं स्वतःचं वांगणी ला घर आहे त्याभोवती निरनिराळे वृक्ष आणि बगीचा आहेत. यातून पडणारा पानांचा कचरा आम्ही कंपोस्ट बनवण्यासाठी वापरतो हेच जर तो जळला तर हरित वायूंचे प्रदूषण होईल.

पाण्याची समस्या

आता बघूया पाण्याची समस्या, नागरी जीवनात जे पाणी येतं ते कुठेतरी नदी वरती बांध घालून त्याचा योग्य तो साठा करून,  शहरात पुरवला जातो म्हणजेच तिथल्या शेतकऱ्याचा पाण्याचा वाटा आपण शहरात वापरतो. बऱ्याच ठिकाणी बघितलं तर संडासात पाणी हे म्युनिसिपालिटीकडून येणारे पाणी वापरले जाते. आपण हिशोब केला तर  सरासरी १०० लिटर पाणी फुकट घालवले जाते तेही संडासात. हे पाणी बनवण्यासाठी बरच खर्च येतो. दुर्दैवाने, शहरी लोकांना याची जाणीव नाही गावामध्ये एक कळशी पाणी आणण्यासाठी ३-४ किलोमीटर पायपीट करावी लागते. शहरी माणसांना हेच पाणी मुबलक नळावाटे मिळते.

यावर उपाय बघितला तर हे पाणी आपण परत वापरू शकतो, पाणी शुद्धीकरणाच्या मुख्य प्रक्रिया गाळणे, रिव्हर्स ऑस्मॉसिस मेम्ब्रेन, नंतर युवीची ट्रीटमेंट हे सर्व करून पाणी निर्जंतुक बनते. संडासात फ्लश करण्यासाठी वापरता येईल अशा प्रकाराने जवळजवळ ९० टक्के पाणी आपण परत वापरू शकतो. शिवाय भारतात भरपूर पाऊस पडतो. सरासरी तीन हजार मिलिमीटर पाऊस हा एका मोसमात पडतो याचा हिशोब करायचा झाला तर आपले छत जर २५ स्क्वेअर मीटर असेल तर सरासरी एक लाख लिटर पाणी आकाशातुन पडतं, हे सर्व पाणी वाहून जातं गटारातून. पावसाचे पडणारे पाणी हे अतिशुद्ध असतं याचा वापर जर बोरवेल भरण्यासाठी केला तर पूर्ण उन्हाळा पुरेल. एवढे पाणी आपण जमिनीच्या खाली साठवू शकतो यातून आणि एक साध्य होते भूस्तर मधला पाण्याचा साठा वाढतो. आपल्याला तसंच शेजाऱ्याला ही त्याचा फायदा होतो. एकंदर काय तर वाया जाणारं पाणी वाचलं तर आपलं जीवन समृद्ध झाल्याशिवाय राहणार नाही. पाण्याच्या रक्षणासाठी आमचं वांगणी ला घर आहे तिथे बोरवेल च भरण आम्ही करतो, भरपूर पाणी होतं उन्हाळ्यात पण पुरतं.

वातावरणाचे प्रदूषण

पर्यावरणातील तिसरी समस्या म्हणजे वातावरणाचे प्रदूषण. हवेमध्ये साधारणपणे ७८ टक्के नायट्रोजन, २१% ऑक्सिजन, साडेतीनशे ते चारशे पार्ट पर मिलियन एवढं कार्बन-डाय-ऑक्‍साईड हे प्रमाण सुनिश्चित असत. जेव्हा हवेतला कार्बन डाय-ऑक्साइड चे प्रमाण वाढते तसेच नायट्रोजन ऑक्साईड आणि सल्फर ऑक्साईड यांचे प्रमाण वाढते तेव्हा हवा प्रदूषित झाली असे म्हणतात. याच बरोबर मिथेन, हायड्रोजन सल्फाइड, हायड्रोकार्बन क्लोरीन, हायड्रोक्लोरिक ॲसिड, इत्यादी वायूंचे प्रमाण वाढते तेव्हा प्रदूषण वाढलेले असते. या सर्वाचे मूळ डिझेल आणि पेट्रोल वर चालणाऱ्या गाड्या. या गाड्यांनी  प्रदूषणाचा उच्चांक गाठला जातो, हवेतील कणांचे प्रमाण वाढते परिणामी श्वसनाचे रोग वाढतात एकंदर सर्वच प्रकृतीवर परिणाम होतो. अस्थमा, क्षय, यासारखे रोग वाढीस लागतात.

हवेचे प्रदूषण टाळण्याचे उपाय आता बघूया, मुख्यत्वेकरून पेट्रोलियम जाळल्याने प्रदूषण होते जर प्रत्येकाने स्वतःची गाडी न्यायची म्हंटलं तर अनंत गाड्या रस्त्यावर धावतील पण जर पब्लिक ट्रान्सपोर्ट व्यवस्थित असेल तर प्रत्येकाला गाडी नेण्याची गरज नाही, तसंच पूर्वीसारखी सायकल चालवता येते, त्यांनी प्रदूषण होत नाही शिवाय कचऱ्याच्या  व्यवस्थापनामुळे कचऱ्यातून निघणारे हरितवायू नियंत्रित होतात. यासाठी सर्व लोकांची इच्छा व सरकारची इच्छा हे दोन्ही काम करणार आहेत आणि आपण प्रदूषण मुक्त होणार आहोत विचार  करूया आणि अमलात आणूया.

निष्कर्ष

शहरीकरण औद्योगिकीकरण आणि आपला प्रकृति बरोबरचा व्यवहार, या कारणांमुळे प्रदूषणाची समस्या वैश्विक समस्या झाली आहे याचे निराकरण खूप परिश्रमाने होऊ शकतं. विश्व पर्यावरण दिनाच्या निमित्ताने आपण अशी शपथ घेऊ माझे वागणे माझ्या सवयी निसर्गाला अनुसरून असतील. मी वापरणारे पदार्थ वाया घालवुन देणार नाही. त्यांचा परत परत उपयोग करेन.

One thought on “पर्यावरण दिन

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s