लेखक: अमित खेडकर, सिस्टिम इंजिनीर, इवाटेक कॉर्पोरेशन, नागासाकी, जपान.
मित्र आणि मैत्रिणींनो,
कोरोना चा दुष्परिणाम तर आपण बघतच आहात पण दुसरी कडे बगायला गेलं तर एक जबादार नागरिक म्हणून आपण निसर्गाची, आपल्या आजू बाजू ची किती काळजी घेतली पाहिजे याचे महत्त्व आज आपल्याला नक्कीच कळाले असणार.
हि निसर्गाला आपण दिलेली हानी आहे आणि ती आपल्याला सहन कराविच लागणार. शेवटी म्हणतात ना जस पेरावे तास उगते त्यातलाच हा एक भाग. एवढ मात्र खरे कि आता या मधून आपण काही शिकायला हवं. असे पुढे आजार येणारच जर आपण आपल्याला पर्यावरणाची काळजी घेतली नाही किंवा ते सुंदर आणि स्वछ ठेवायचा प्रयन्त केला नाही.
सध्या परिस्तिथी मध्ये सर्वांत मोठे कारण आहे पर्यावरणात वाढणारा कार्बन डायॉक्सिड वायू. ते आपण कास कमी करता येईल याकडे भर दिला पाहिजे. ऊर्जेची गरज प्रत्येकालाच आहे आणि त्यातूनच सर्वात जास्त कार्बन डायॉक्सिड वायू चे प्रमाण वाढते.जर आपण कार्बन डायॉक्सिड कमी करणारे ऊर्जेचं स्रोत वापरले तर नक्कीच पर्यावरणात स्वछ हवेचे प्रमाण वाढेल जे नक्कीच उत्तम आरोग्यसाठी फायदेशीर असेल.
सौर ऊर्जा: सौर ऊर्जेचा अर्थ सूर्यापासून मिळणाऱ्या उर्जेला विजेमध्ये रुपांतर करणे होय. सूर्याच्या किरणांचे ऊर्जेमध्ये रूपांतर केले जाते. सौर ऊर्जेचे अनेक फायदे आहेत जसे कि नूतनीकरणयोग्य उर्जा स्त्रोत, वीज बिले कमी करणे, विविध प्रकारे उपयोग, कमी देखभाल खर्च, शासकीय अनुदान उपलब्ध.
पावन ऊर्जा: पवन ऊर्जा मध्ये वायू द्वारे यांत्रिक शक्ती किंवा वीज निर्मिती केली जाते.
बायोगॅस: बायोगॅस हा जैविक इंधनाचा एक प्रकार आहे जो नैसर्गिकरित्या सेंद्रिय विघटनातून तयार होतो. कचरा, खराब झालेले अन्न, मलमूत्र, शौचालय घाण या सर्व गोष्टींपासून बायोगॅस निर्मिती होऊ शकते. होतो.
महासागर उर्जा: समुद्रापासून प्राप्त झालेल्या उर्जेला महासागर ऊर्जा म्हणतात. महासागर तंत्रज्ञानाचे तीन मुख्य प्रकार आहेत: लाटा, भरतीसंबंधी आणि समुद्री औष्णिक.
भूऔष्णिक ऊर्जा: पृथ्वीच्या कवचात निसर्गत: आढळणारी उष्णता म्हणजेच भूऔष्णिक ऊर्जा. ही ऊर्जा भूकवचाच्या खडकातील विभंग आणि उष्ण जागा यांमध्ये उपलब्ध असते. या स्रोतामधील प्रवाही जल वाफेच्या रूपात असून त्यापासून वीज निर्मिती केली जाते.
हायड्रोजन आणि फ्युएल सेल ऊर्जा: इंधन सेल एक इलेक्ट्रोकेमिकल सेल आहे हायड्रोजन ऑक्सिजन चे यांचे रासायनिक उर्जा मध्ये रुपांतर करते. असं बोललं जातंय हायड्रोजन हे भविष्यातलं सर्वांत जास्त उपयोगात येणार ऊर्जेचं स्रोत असेल.
प्रत्येक उर्जेला काही फायदे आणि काही तोटेही आहेत. जास्त तपशील येते आम्ही दिलेला नाही जर तुम्हांला खोल माहिती हवी असल्यास आम्हांला संपर्क करा.
आपल्या आजूबाजूला इतकी मुक्त उर्जा आहे की आपल्याला उपयोग करण्याची आवश्यकता आहे. माहितीपूर्ण लेख.
LikeLike