लेखक: डॉ. नितीन निमकर, मुंबई
नमस्कार आपण ई-वेस्ट बद्दल पाहणार आहोत ई वेस्ट म्हणजे इलेक्ट्रॉनिक वेस्ट यामध्ये आपण वापरणारे रेडिओ टीव्ही कॉम्प्युटर लॅपटॉप मोबाईल अन्य इलेक्ट्रॉनिक साधने यांचा समावेश असतो आपण कधी विचार केलात का की हे वापरून झाल्यावर त्याचं पुढचं भवितव्य काय असतं? आपल्या घरातली ही साधने आपण कशी फेकून देता? जेव्हा ते उघड्या घाळी वर पडतात तेव्हा त्याचं काय होतं याकरता इलेक्ट्रॉनिक्स कसं बनवतात याचं ज्ञान आवश्यक आहे इलेक्ट्रॉनिक बोर्ड बनवला जातो त्यामध्ये सिलिका, ईपॉक्सि रेसिन,पॉली ब्रोमिनेटेड बाय फेनेल , लेड, कॅडमियम, मर्क्युरी, क्रोमियम, गोल्ड, सिल्वर, पॅलॅडियम सॉल्डर इत्यादी पदार्थ वापरले जातात यातील पॉली ब्रोमिनेटेड बीफेनील हे टॉक्सिक असतात ते विघटनशील नसतात शिवाय कर्करोग कारक असतात. अशा रीतीने हे सर्व घातक पदार्थ जेव्हा उघड्या मैदानावर टाकले जातात ते विघटन होत असताना हे घातक पदार्थ आपल्या पाण्याच्या स्त्रोतांमध्ये मिसळतात.
आपण आता सरकारचा याबाबतचा दृष्टिकोन काय आहे हे बघूया या सर्व समस्या लक्षात घेऊन सरकारने ई-वेस्ट रुल्स २०१६ साली बनवलेले आहेत नियमानुसार ज्या कोणी इलेक्ट्रॉनिक वेस्ट तयार केलेले आहे त्यानेच ते योग्य मार्गाने विल्हेवाट लावणे आवश्यक आहे. उत्पादक आणि ग्राहक यांच्या जबाबदाऱ्या सांगितलेल्या आहेत. या नियमांनुसार इलेक्ट्रॉनिक वस्तू निकामी झाल्यावर मुनिसिपले वाटे मध्ये टाकणे हा गुन्हा आहे . या वस्तू ऑथोराइज्ड ई-वेस्ट व्यवस्थापकांकडे देणे आवश्यक आहे.
भारतात तयार होणार वेस्ट पैकी सर्वात जास्त वेस्ट पश्चिम (३५%) भाग देतो त्याखालोखाल दक्षिण (३०%) त्याखालोखाल उत्तर (२०%) त्याखालोखाल पूर्व (१५%). तयार होणाऱ्या कचऱ्यापैकी नॉन -फेरस मेटल्स १८%, ग्लास १५%, फेरस मेटल ३२%, प्लास्टिक २३%, इलेक्ट्रॉनिक बोर्ड १२% असे प्रमाण आहे, सर्वात टॉक्सिक इलेक्ट्रॉनिक बोर्ड आहेत.
सध्या यातील ९०% ई-वेस्ट कबाडी, रद्दीवाला यांच्याकडून हाताळले जाते. हि गोष्ट खूप घातक आहे. कसे ते बघू या , मॉनिटर जेंव्हा फोडतात तेंव्हा त्यातले घातक थर वातावरणात मिसळतात ग्लास जमिनीत गाडून टाकतात घटक पदार्थ मग येणाऱ्या अन्नामध्ये मिसळून संपूर्ण फूड चेन मध्ये जातात व बाळाला आईच्या दुधातून विषारी पदार्थ जातात. याच प्रमाणे हार्ड डिस्क, सर्किट बोर्ड, प्रिंटर , केबल्स अँड वायर्स जाळल्या जातात, त्यातून विषारी वायू हवेत मिसळतात.
या समस्येवर एकच उपाय आहे, तो म्हणजे नियमाप्रमाणे ऑथोराइज्ड वेस्ट डीस्पोसार कडे वेस्ट देणे. चला या पृथ्वीला विषारी होण्यापासून वाचवूया.
धन्यवाद