डेटा सेंटर किती ऊर्जा खातात?

लेखिका: अनुजा सावंत, संस्थापक – हरित मराठी

Photo by Pixabay on Pexels.com

डेटा सेंटर ही अशी ठिकाणं आहेत जिथे संगणकीय आणि नेटवर्किंग उपकरणे केंद्रित असतात. येथे मोठ्या प्रमाणात डेटा संग्रहित, व वितरित केला जातो आणि त्यावर प्रक्रिया हा होते. हे वाचण्यासाठी आपण वापरत असलेला फोन किंवा संगणक यासाठी हे डेटा सेंटर आवश्यक आहेत. गूगल, अँपल, मायक्रोसॉफ्ट अश्या मोठ्या कंपन्यांना मोठे डेटा सेन्टर्सची गरज असते. 

तुलनेसाठी संपूर्ण भारताला एकूण १,५६१ टेरावॉट-तास ऊर्जेची आवश्यकता आहे. या तुलनेत यावर्षी जगभरातील डेटा सेंटरमध्ये ६५१ टेरावॉट-तास विजेचा वापर अपेक्षित आहे. विजेचा वापर म्हटलं कि हरितगृह वायूचा विषय हा यायलाच हवा. 

इंटरनेट चालू ठेवण्याकरता डेटा सेंटर सतत चालू ठेवावी लागतात. यामुळे उष्णता निर्माण होते आणि शीतकरण केले जाते.  शीतकरणासाठी ऊर्जेची गरज असून बरेच हरितगृह वायूहि उत्सर्जित होतात. 

पृथ्वीवरील वातावरणामधील प्राथमिक हरितगृह वायू म्हणजे पाण्याची वाफ, कार्बन डाय ऑक्साईड, मिथेन, नायट्रस ऑक्साईड आणि ओझोन आहेत. हे रेणू उष्णता शोषून घेतात ज्याने आजूबाजूचे वातावरण गरम होते. पृथ्वीसाठी हे योग्य प्रमाणात चांगलं आहे, नाहीतर खूप थंडीमुळे शुक्र ग्रहाप्रमाणे पृथ्वीवरचे जीवन नाहीसे झाले असते. परंतु जेव्हा या वायूंचं प्रमाण वाढतं तेव्हा ते वातावरण बदलाला (ग्लोबल वॉर्मिंग) कारणीभूत ठरू शकतं. एकंदरीत हरितगृह वायूचा समतोलपणा राखणं गरजेचं आहे.

गूगल आणि अँपल १००% अक्षय उर्जेवर आपली डेटा सेंटर चालवतात. २०३० पर्यंत १००% नूतनीकरणयोग्य करण्याच्या विचारात असल्याचे अ‍ॅमेझॉननेहि म्हटले आहे. आणि मायक्रोसॉफ्टने कार्बन कॅप्चर तंत्रज्ञानात गुंतवणूक करण्याचे उद्दीष्ट जाहीर केले आहे.

चला विविध तांत्रिक निराकरणे पाहू. कार्बन कॅप्चर म्हणजे उत्सर्जित कार्बन डायऑक्साईड कैद करण्याची प्रक्रिया. जसे की सिमेंट फॅक्टरी किंवा बायोमास उर्जा संयंत्र. बहुधा भूगर्भीय संरचनांमध्ये साठवून त्यांना कैद केले जाते जेणेकरून ते बाहेर पडून वातावरण बदलणार नाहीत. 

त्या अधिक, इमारतींसाठी लीड प्रमाणपत्र, ऊर्जा-कार्यक्षम उपकरणे, उष्णतेचा पुनर्वापर अशी काही आणखीन उदाहरणे आहेत.

पारंपारिक इमारतींच्या तुलनेत लीड मंजूर इमारती अत्यल्प उर्जा वापरतात.

थंडीच्या ठिकाणी, घरं आणि कार्यालयं तसेच हरितगृह आणि जलतरण तलाव गरम करण्यासाठी डेटा सेंटरमधील उष्णता वापरण्यात येऊ शकते. 

निसर्ग काहीही व्यर्थ जाऊ देत नाही. आपण उष्णता का वाया घालवायची? 

कसं वाटलं? आम्हाला कळवा info@haritamarathi.com वर किंवा खालील बटण वर क्लिक करा ते तुम्हाला थेट तुमच्या ई-मेल अँप वर नेईल.

One thought on “डेटा सेंटर किती ऊर्जा खातात?

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s