लेखक: शिवसांब घोडके, औरंगाबाद
लाख – Lathyrus sativus Fabaceae
हे वाटाणा वर्गीय लहान पीक वनस्पती आहे.ही गोड वाटाणा सारखीच वनस्पती आहे.
साधारण दोन फूट उंचीपर्यंत वाढते.
याच्या खोडावर कसलेही केस नसलेले चकचकीत खोड.खोडाजवळ पंख असल्यासारखे असते.
पाने अरूंद लांबट आहेत.याची फूले पांढरट निळे ते गूला.
जवळजवळ लंबवर्तुळाकार त्यास पंख असलेले असतात.
ही वनस्पती कमी पाण्यात तग धरुन राहु शकते.
दूष्काळाच्या वेळी ह्याचा वापर केला जातो.
ह्या पासुन तूरीच्या डाळीसारखी दाळ मीळते परंतु ती थोड्या प्रमाणात माणसांना निरुपद्रवी असल्याचे समजते.
भारतात १९६१ पासून लाखोळीच्या डाळीवर बंदी होती.
पुर्व विदर्भात भंडारा,गोंदिया,गडचिरोली,चंद्रपूर या भागात जास्त प्रमाणात उत्पादन घेतले जायचे.
सध्या भारतीय वैधक संशोधन परिषदेने या डाळीवरील बंदी उटवल्याचे वाचन्यात आले.