‘निसर्गाचे बाळकडू’: हरित मराठी घेऊन येत आहे शिवसांब घोडके यांचं नवीन संपादकीय

परिचय लिहिला आहे विनायक हरिहर सोनवळे यांनी (@vinayak_300)

ता.लोहा जिल्हा नांदेड

मराठवाडा!

मराठवाडा म्हनले की सर्वांच्या नजरेसमोर येतो तो भयावह दूष्काळ, भयंकर उष्णतामान आणि कोरडी उघडी बोडकी गवताळ माळरान त्यातल्या त्यात जंगलाचा विचार करता नांदेड जिल्हा हा काही प्रमाणात प्रचंड दर्या, टेकड्या, व नद्यांनी व्यापलेला व यातुनच दक्षिणेतील गंगा म्हनजे गोदावरी नदी वाहाते आणि नैसर्गिकरित्या जिल्हयाच्या मधोमध वाहात असल्याने जिल्ह्यात जैवविविधते बाबतीत दोन भाग करत पूढे तेलंगणात जाते.

गोदावरी नदिच्या उत्तरेकडील भाग हा नैसर्गिक साधनसंपत्तीने व्याप्त भाग व दक्षिणेकडील भाग मात्र नुसत्याच उघड्या ब़डक्या माळरानांच्या टेकड्या जास्तीची कसदार जमीन नाही,पाउसाची कमतरता याच भागात जन्मल्याचे भाग्य मला लाभले. या डोंगराळ भागात येथील एक वेगळीच जैवविविधता साखळी फक्त येथेच आढळते त्याच प्रमाणे येथील माणसेही अत्यंत मायाळू, कष्टी या परिसरात मी शिक्षण शिकत असताना मला लाभलेला माझा जीवलग सखा सोबती मला कायम मदतीस धावणारा कायम सोबत असणारा, बालमित्र, वर्गमित्र शिवसांब घोडके या व्यक्तीचे माझ्या जीवनातील स्थान जगावेगळे आहे, शाळेत दोघेही एकाच वर्गात जिल्हा परिषदेच्या शाळेत जायचो पहिली ते चौथी पर्यंत शाळा होती शाळेत सोबत एकत्रच बसायचो.

शाळेच्या मधल्या सूट्टीत तो शाळेच्या जवळील मोकळ्या मैदानात असलेल्या अंबुसकंदाच्या मुळी काढुन आणायचा व तो खूप आवडीने खायचा, ऐकही दिवस शाळा न बूडवणारा तो त्याचा सोबत रहायला माझ्या घरूनही परवानगी असायची, कधीकधी शाळेच्या मधल्या सूट्टीत फड्या निवडुंगावरील लाल चुटूक असलेले फळ तो लाकडास तार बांधून खूप अलगत काढायचा,आणि मोठ्या शिताफीने त्याफळावरील काटेवजा केस काढून खायचा व मलाही द्यायचा.

कधीकधी शाळसमोरील चिंचेच्या झाडावरील चिंचा बेमालूमपणे झाडावर चढून चिंचा काढायच्या. दर शनिवारी, रविवारी जनावरांना घेउन आम्ही त्यांच्या दूरच्या नदिकडील शेताकडे जायचो त्यादिवसी मात्र आम्ही सात आठ जन असायचो शेत गावापासून थोडे दूर आसले तरीसुद्धा तीथे निसर्गाच्या मध्ये खेळायला बागडायला, नदिच्या गूडघाभर पाण्यात पोहायला,कधी सिताफळ खायला भेटायची, कधी चार बोर, जांभूळ, आंबे, एरोणी, धामणीचे फळ, कार खाण्याची आमची मेजवानीच असायची, या रविवारी सिताफळ सर्वांनी फिरुन शेतात एक खड्डा करून त्यात गवत टाकुन त्यात “माच” अगदी बेमालूमपणे कोनालाही समजणार नाही याची दक्षता घेत तो खड्डा सिताफळांनी भरून अगदी जसी जमिन आहे तसीच करून घराकडे ययचो आणि एखाद्या सुट्टीची व येणाऱ्या शनिवारची वाट बघत बसायचो जसा शनिवार आला आर्धा दिवस शाळा संपली की आम्ही थेट शेतात सिताफळ खाण्यासाठी जायचो मनमुरादपणे सिताफळ खायचो, पोहायचो, तेथी किनीच्या झाडांनवर असलेल्या सोनकिड्यांना पकडण्यात व्यस्त होउन त्या उडणाऱ्या किड्यांचा पाटलाग करत झुडपांनी पळायचो व सोनकिड्यांना पकडायचो आणि त्या किड्यांना माचिसच्या काडिपेटीत ठेउन बाभळीचा पाला, ज्वारीचे पिठ खायला घालायचो, त्याला भुरभुर उडवण्यात लय भारी आनंद यायचा तो कोनाच्या किड्याने काती अंडी दिली याच्यावर घर्चा रंगायच्य.

कधीकधी मोहोळही खायला भेटायचे. असे कायम त्याच्या सोबत निसर्गाच्या सानिध्यात बागडता बागडता बारावीच्या वर्गापर्यंत शिक्षण गावातच घेतले, पूढच्या शिक्षणासाठी आम्ही विज्ञान शाखेच्या पदवी अभ्यासक्रमास प्रवेश घेतला घरची अर्थीक परिस्थिती जेमतेम असल्याने आम्ही सायकलनी जाणेयेणे करायला सूरवात केली जवळपास पाच किलोमीटर जाणे येणे एकाच सायकलवरती डबलशिट करत असतानाच आम्ही दोघांनी एकाच क्षेत्रात नोकरीसाठी अर्ज करायचो करायचो व मुलाखतीही द्यायचो, अचानकपने राज्यातील वनविभागातील जागेसाठी जाहीरात आलेली पाहीली व आम्ही दोघांनीही त्या ठिकाणी नोकरीसाठी अर्ज केले, त्यास जास्त मार्कामुळे त्यास मुलाखतीसाठी निवड झाली मलाही खूप आनंद वाटला दोघापैकी एकजन मुलाखतीसाठी पात्र झालाय, त्याची मुलाखतही झाली आणि वनविभागात वनरक्षक या निसर्गाच्या महत्वपूर्ण पदावर त्याची निवडही झाली.

मला आनंदही झाला व आता वेगवेगळे व्हावे लागेल या विचाराने दूखही झाले परंतु जड मनाने जिवलग मित्रास नोकरीवर रूजू होण्यासाठी निरोप दिला आणि आमच्या मैत्रिस दूरावा वाढला. तो विदर्भातील जंगलात रूजू झाला त्याला बालपणापासूनच जल, जंगल, पशुपक्षी, किटक यांचा सहवास लाभलेला असल्याने तो जंगलाच्या नोकरीत मनाने चांगलाच रमला, विविध पशुपक्षी, औषधी वनस्पती, झाडे, वेली यांच्या ससवासात तो रममाण झाला, जंगल क्षेत्रातील प्रशिक्षणात तो अनुभवाने सम्रद्ध असल्याने आवड आसल्याने प्रशिक्षणाच्या बँचमध्ये तो सूवर्णपदकासह सर्वप्रथम आला, वन वन्यजीव यांच्या बद्दलची प्रचंड आस्था वाढिस लागलेली होती.

जास्तीत जास्त वेळ तो ह्या वन्यपशूपक्षी, झाडांच्या सोबत घालवायला लागला, औषधीवनस्पती बाबतीत प्रचंड माहिती एकत्र जमविली होती, पाचसहा वर्ष विदर्भातील वन वन्यजीवांची सेवा करून मराठवाडातील नांदेड वनविभागात व लहानपणापासून माहिती असलेल्या क्षेत्रात तो परत आला पण माहीतीचा प्रचंड खजाना घेउनच. किनवट सारख्या पैनगंगा अभयारण्याच्या परिसरातील विदर्भाच्या सिमेस लागून,दूसरीकडे तेलंगणा राज्याची सिमा लागुन असलेल्या नक्षलग्रस्त, अतिदुर्गम, डोंगराळ, प्रचंड मोठे जंगल असलेल्या क्षेत्रात नियूक्ती झाली तीथे त्याच्या बाळकडू अनुभवाच्या सम्रद्ध विस्वासावर प्रचंड मोठ्या प्रमाणात जंगल तस्करांनवरती आळा बसवला, जंगल तस्करांना पकडून मा.न्यायालयात उभे करून जंगल तस्करांच्या मुसक्या आवळल्या थोड्याच दिवसात तालूक्याच्या परिसरातील जंगल तस्करांवरती आळा बसवला निसर्गाची कधीही भरून न येणारी होणारी हाणी थांबवली व जंगलाचे संरक्षण केले.

याचीच दखल घेउन त्यास राज्याच्या सन्माननिय मुख्यमंत्र्यांच्या, मा.वनमंत्र्यांच्या हस्ते सूवर्ण पदकासह प्रमाणपत्र देउन सन्मानित केले. किनवट सारख्या घनदाट जंगलक्षेत्र असलेल्या भागात औषधी वनस्पतीवर संशोधन करण्यासाठी येणारे पूणे,नांदेड,औरंगाबाद,कोल्हापूर येथील बाँटनीचे संशोधक यांच्या मार्गदर्शनाखाली औषधी वनस्पतींची प्रचंड माहिती एकत्र जमवीली आहे तेथी आदिवासी बांधव उपयोग करत असलेल्या औषधी वनस्पतींची माहिती जवळुन घेउन औषधी वनस्पतींची माहिती एकत्र केली व दूर्मीळ होत चाललेल्या वनस्पतींची बी जंगलातुन एकत्र करुन रोपवाटिकेत रोपे तयार करून त्याची लागवड जंगलक्षेत्रात केलेली आहे. ह्या औषधी वनस्पतींची माहीतीचे भांडार असणाऱ्या आवलीयास खूप दिवसानंतर भेटण्याचा योग आला तेही निसर्गाच्या सानिध्यातच…

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s