निसर्गाचे बाळकडू (अंक १)

लेखक: शिवसांब घोडके

अस्वीकरण: औषधी माहिती गावातील ऐकीवआहे, मनाने वापर करु नये. तज्ञांचा सल्ला घ्यावा.

चला निसर्ग भ्रमंतीला….

आपली संस्कृती ही पुरातन काळापासून निसर्गासी जोडलेली आहे संस्कृतीतील जवळपास सर्वच सण हे निसर्गासी निगडीतच आहेत आणि निसर्गातील वन वन्यजीव यांच्याशी भावनिक असलेले हे कसे एकमेकांना परस्पर पूरक आहेत हे सांंगण्यासाठी व त्याचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी प्रत्यक्ष दैवतांची स्थाने व वहाने निगडीतच आहेत. देवींचे वाहानेही प्राणीच आहेत आणि त्यातुन ते निसर्गासी आपले प्रगाढ नाते सांगून वन्यजीवांना संरक्षण देण्यासाठी प्रेरणादायी आहेत.

सध्या जागतिक तपमान वाढीबद्दल बरीचसी चर्चा होतांना दिसुन येते जागतिक तपमान वाढीमुळे पर्यावरणाची अपरिमीत हनी होते व निसर्गातील जैवविविधतेच्या अनेक साखळ्या नष्ट होत आहेत. अवेळी येणारा पाउस कमी दिवसात जास्त पाउस. हे सूद्धा जागतिक तापमान वाढीचेच परिणाम आहेत. काही वेळेस दूष्काळ काही वेळेस नको त्यावेळी अतिव्रष्टी यामुळे वन व वन्यजीवांनवर परिणाम होतो. त्यामुळे प्रदूषण कमी करण्यासाठी अपारंपरिक उर्जास्त्रोतांचा वपर गरजेचा आहे.

यासर्व बाबींनवर एकमेव उपाय म्हनजे झाडे लावा झाडे जगवा. वनांतील बाहेरील हस्तक्षेप जनजागृतीने थांबला पाहीजे तेथील असलेली जैवविविधता ठिकवली पाहिजे. वनक्षेत्रात वेगवेगळ्या प्रकारच्या प्रदेशात वेगवेगळी जैवविविधता साखळी आढळून येताना दिसते. जंगल क्षेत्रातील जैवविविधता ही वन व वन्यजीवांन साठी पोषक असते. जास्त दाट झाडे असणाऱ्या जंगल क्षेत्रातील वेगळी. गवताळ प्रदेशातील वेगळी.

काही काही प्रजाती ह्या प्रदेशनिष्ट असतात तर काही भरपूर प्रमाणात दिसून येतात. याचेच उदाहरण म्हनजे गवताळ प्रदेशात आढळणारे माळढोक पक्षी (Great indian busterd) हे राज्यातुन अतिशय दूर्मीळ आहेत त्यांच्या साठी गवती कुरणे असणे गरजेचे असतात.

ज्या ठिकाणी गवताळ प्रदेश असतो तीथे तृणभक्षी प्राणी असतात. ज्याठिकाणी तण भक्षी प्राणी तीथे त्यावर जगणारी मांसभक्षी प्राणी असतात. याचे चांगली साखळी राहीली म्हणजे जैवविविधतेची साखळी चांगली व्यवस्थित राहाते. ज्या जंगलात वाघाचे अस्तित्व आसते ते जंगल सूस्थीतीत असल्याचे शुभसंकेत मानतात. यातील एकही जरी जीव कमी जास्त झाला तरीही पर्यावरणावर खुप मोठा परिणाम दिसुन येतो. संत तुकाराम महाराजही त्यांच्या अभंगात म्हनतात.

*वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे*
*पक्षीही सुस्वरे। आळविती।।*
*येणे सुख रुचे एकांताचा वास।*
*नाही गुणदोष। अंगी येत।।*

जगदगूरू तूकाराम महाराजांच्या वेळी तर केवळ जंगलच होती तेंव्हा तर निसर्गावर येवढे संकटही नव्हते तरीसुद्धा तुकोबारायांनी झाड, झूडूप, लता, वेलींना,पशू,पक्षी, वन्यजीवांन बद्दल ते सोयरेच असल्याचे लिहून ठेवले आहे मग आतातर आपणास काळजी घेण्याची गरज आहे. वनात फिरत असताना वन हे नितनवे वाटते रोज बदल होतो म्हनतात ना बदल हा निसर्गाचा नियमच आहे त्याच प्रमाणे सकारात्मक बदल होत असतात.

पशू पक्ष्यांचे एक वेगळेच जग असते व तीथे ते मनसोक्त विहार करत असतात. याच प्रमाणे जंगलातील असणारे किटकांचेही वेगळेपण आपणास दिसुन येते. यातील माझ्या प्रत्यक्ष पाहाणीत आलेले एक क्षण सांगतो.

जंगलात निलगायी रोज एकाच ठिकाणी लेंड्या टाकत असतात त्यास “मकर” म्हणतात. त्या मकरातही काही किटक जगत असतात त्यातीलच एक “शेणकिडा” म्हनजेच डंग बिटल ( dung beetle) याचे जवळून निरीक्षण करण्याचा योग आला तो शेणकिडा साधारण मोठ्या खेळण्यातील गोटीयेवढा असेल तो त्याच्या वजनाच्या व अकारमानापेक्षा चारपट मोठा शेणाचा गोळा त्या मकरातुन काढुन गोल गोळा बनवतो. तो बनवलेला गोळा ढकलत ढकलत सूमारे पाचशे मिटरपेक्षाही जास्त अंतर वाहून नेत असतो व त्याच्या बिळात नेउन तो जमा करत असल्याचे निरीक्षणातून समजले असे करत करत तो भरपुर मोठ्या प्रमाणात तीथे ते शेणाचे गोळे एकत्र करून ठेवत असतो व पावसाळ्यात ते अन्न म्हनून वापरत असतो. ही किड्यांची कसरत केवळ अन्नासाठीच नसून ती जैवविविधता ठिकवण्याचे कार्य पार पाडते.

त्याच प्रमाणे काही फुलपाखरेही खुप अश्चर्यकारक असतात आपणास फूलपाखरे बागडताना केवळ पाहीले तरी मनास आनंद होउन मन प्रफुल्लित होते. मन प्रफुल्लित झाल्याने व केवळ फूलपाखरे बागडतानी पाहील्याने रक्तदाब नियंत्रित होत असल्याचे लक्षात येते. काही फुलपाखरे ही रात्री फिरतानी दिसतात तर काही दिवसा रात्रीच्यांना पतंग म्हनतात. यातीलच एक फुलपाखरू घरातील भिंतीवर बसलेले दिसले त्यास पाहीले असता त्यांने लहान लहान अकाराची असंख्य अंडी दिलेली दिसुन आली त्या फुलपाखराचे नाव तूशार सिल्क माँथ होते. फूलपाखराचे तयार होण्याची पद्धत खुप छान आहे. तो प्रथम अंडी देतो.त्या अंड्यातून अळी बाहेर पडते व अळी, सूरवंट काही दिवसांनी स्वतःभोवती कोष तयार करून त्यात मध्ये राहाते व काही दिवसांनी त्यातून पूर्ण वाढ झालेली फूलपाखरे बाहेर पडतात ती अत्यंत रंगीबेरंगी अकर्षक असतात ते केवळ दोन तीन अठवडेच जगतात परंतू ते परागीभवनाचे भवमुल्य कार्य पार पाडतात.

त्यातीलच तुषार सिल्क माँथ हा त्याच्या तोंडावर असलेल्या दोन अंटिनाच्या सहाय्याने मादिसी रासायनिक सिग्नल पाटउन जवळपास एक किलोमीटरवर संपर्क करू शकतात. निसर्गाने संभाषण करण्यासाठी दिलेली दैवी देणगीच म्हनावी लागेल ना अश्या चमत्कारिक फुलपाखरांचा अधिवास आपणास सूरक्षित करावा लागेल एक कर्तव्य म्हणून. पर्यावरणातील प्रत्येक बारीकसारीक जीवजंतू आपापल्या कार्य नेटाने पार पाडत असतात. सध्या साजरा झालेला दसरा सण त्यात आपटा झाडास तर सोनच म्हनुन मानले गेलेय ही झाडांना जपन्याची विचारशैली पूर्वापार चालत आली आहे.

आपटा झाडास शास्त्रीय भाषेत Bauhinia recemosa म्हनतात तर त्याचे कूळ हे Caesaipiniaceae आहे. अनेक फांद्यांचे मध्यम उंचीचे झाड शेतीत तसेच जंगलात आढळणारे झाड आहे. पाने एकाआड एक टोकाकडे थोडाभाग चिरलेला बाकी दोन पाने एकमेकास चिकटलेले. याची फूले फिक्कट हरवट पिवळी. यास चपट्या शेंगा लागतात व त्यात बी असते.दसर्यास या पानांना सोन्यासारखे महत्व.याची पाने,साल,कोवळी फूले औषधी म्हनुन वापर.व्रण जाण्यासाठी साल बांधतात, डोकेदुखीत कोवळी पाने वाटून लेप देताना ग्रामीण भागात दिसुन येते. याची झाडे खडकाळ जमीनीवर व कमी पावसाच्या प्रदेशात चांगली वाढतात.व खडक फोडून ती जमीनीत खोलवर मुळे जातात त्यामुळेच त्यास अस्मंतकही म्हनतात.

निसर्गाच्या सानिध्यात प्रत्येकाने आलेच पाहिजे व निसर्ग पर्यायाने पर्यावरणाचे होणारे नुकसान आपण जबाबदार नागरीक म्हनुन नक्कीच थांबवले पाहिजे. तर मग आपण तयार व्हउन चलायच का निसर्गाच्या रक्षणासाठी तर मग नियमीत निसर्ग भ्रमंतीस जायचे व निसर्ग भ्रमंतीत आलेले अनुभव व्यक्त करायचे तर मग चला निसर्ग भ्रमंतीस….

कसं वाटलं? आम्हाला कळवा info@haritamarathi.com वर.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s